Rakesh Jhunjhunwala : धक्कादायक! राकेश झुनझुनवाला यांचे दुःखद निधन

Shocking! Sad death of Rakesh Jhunjhunwala

मुंबई : राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे आज सकाळी निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. मुंबई शेअर बाजारातील ‘बिग बुल’ म्ह्णून त्यांना ओळखले जात होते. मागच्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मुंबईतील ब्रीच कॅण्डी या रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. नरेंद्र मोदींनीही झुनझुनवाला यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.

राकेश झुनझुनवाला यांनी पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये फक्त पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर त्यांनी त्या ५ हजारावर अब्जावधी रुपये कमावले. त्यामुळेमध्यमवर्गीय गुंतवणूकदार वर्गामध्ये राकेश झुनझुनवाला हे लोकप्रिय होते. राकेश झुनझुनवाला हे कोणत्या कंपनीचे शेअर घेतात, याकडे सर्व गुंतवणूकदारांचे कायम लक्ष असायचे.

मागच्या काही दिवसांपूर्वीच झुनझुनवाला यांनी ‘अकासा एअर’ या विमान कंपनीचे उद्घाटन केले होते. ते मागच्या काही वर्षांपासून आजारी होते. नंतर त्यांची तब्येत जास्त बिघडल्यामुळे झुनझुनवाला यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल केले होते. पण, उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. झुनझुनवाला यांच्या निधनाने शेअर बाजार गुंतवणूकदारांमध्ये शोककळा पसरली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *