
राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतराच्या राजकिय घडामोडींमधून महाराष्ट्र आता कुठे सावरत आहे. तोपर्यंत नाशिक येथे अजून एका ‘राजकीय गेम प्लॅनचा ट्रेलर’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थोरात-तांबे कौटुंबिक संघर्षाला सुरुवात, वडिलांनी मुलासाठी घेतलेली माघार यामुळे राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
शिक्षकांना ‘सर’ ‘मॅडम’ संबोधने होणार बंद; सरकारचा मोठा निर्णय!
हा गोंधळ कसा निर्माण झाला ? हा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहिला असेल तर, त्याच उत्तरं आहे देवेंद्र फडणवीस ! काही दिवसांपूर्वी 9 डिसेंबरला सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat) यांनी देखील उपस्थिती दर्शविली होती. इथेच फडणवीसांनी डॉ. सत्यजित तांबेना आमदारकीची लालच दाखवून त्यांच्याभोवती राजकीय जाळे विणले होते.
भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा! क्रिकेट संघातील ‘या’ महत्त्वाच्या खेळाडूचा मृत्यु
‘सत्यजित तांबे ( Satyajeet Tambe) यांच्यासारखे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार, असे लोक जास्त दिवस बाहेर ठेवले, की आमची नजर त्यांच्याकडे जाते,’ असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी त्यावेळी केले होते. यातूनच बरंच काही स्पष्ट होत आहे. नंतरच्या काळात नाशिक मतदारसंघात भाजपकडून विधान परिषदेसाठी कोणालाही अधिकृत उमेदवारी अर्ज न देणे यातून तर फडणवीस यांचा गेम प्लॅन अगदी क्लीअर होत आहे.
मोठी बातमी! भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा घेणार निवृत्तीची
डॉ. तांबेनी नाशिक मतदारसंघ आतापर्यंत बऱ्यापैकी काँग्रेसमय केला आहे. या मतदारसंघात सत्ता मिळवण्यासाठी भाजपने अनेकदा प्रयत्न केला. परंतु, यश आले नाही. म्हणून भाजपने आता थेट तांबे कुटुंबालाच लक्ष्य केले आहे. यामुळेच सत्यजित तांबेनी आमदारकीचे स्वप्न पाहिले असावे. सुधीर तांबेंची उमेदवारी जाहीर होऊनही त्यांनी अर्ज न भरणे, भाजपकडून अधिकृत उमेदवारी अर्ज कोणालाही न देणे आणि शेवटच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घटना यामागे फडणवीसच खरे सूत्रधार आहेत एवढं मात्र नक्की!
बारामतीमधील अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला दिल्याने पोलिसांकडून थेट पालकांवरव कारवाई