
लोकांना विविध प्रकारची व्यसने असतात. व्यसनांच्या (Addiction) आहारी जाऊन कितीही नुकसान होणार असले तरी त्यांना त्यातून बाहेर पडता येत नाही. गुटखा, तंबाखु, पान मसाला, दारू यांची व्यसने शरीरासाठी हानिकारक असतात. यामुळे कॅन्सर, दमा यांसारखे आजार होऊ शकतात. अशाच एका गुटखा खाणाऱ्या माणसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कलिंगड शेतीतून तरुण घेतोय लाखोंचे उत्पादन; युवा शेतकऱ्याचा हा प्रयोग वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
या व्हिडिओमध्ये एक माणूस चक्क गुटखा थुंकण्यासाठी खिडकी उघडण्याची विनंती करत होता. तुम्ही म्हणाल खिडकी तर उघडायला सांगत होता, त्यात काय एवढं ? पण मित्रांनो हा तरुण बसची, किंवा कारची नाही तर चक्क विमानाची खिडकी ( Airoplane Window) उघडण्याची विनंती करत होता. विमानात असणाऱ्या एअर होस्टेस जवळ हा तरुण ही विनंती करत होता. त्याची विनंती ऐकून एअर होस्टेस तर एकदम शॉक होते. मात्र तेवढ्यात तो तरुण हसतो. यामुळे तो प्रँक करतोय हे एअर होस्टेस च्या लक्षात येते. नंतर ती सुद्धा हसू लागते.
मोठी बातमी! विमान दुर्घटनेत ‘या’ प्रसिद्ध गायिकेचं निधन
हा मजेशीर व्हिडीओ videonation.teb या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांनी यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘प्लेन में थुंकना मना है’, ‘मौज कर दी’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर पहायला मिळत आहेत.
अन् स्टेजवरच देवेंद्र फडणवीस यांना भावना झाल्या अनावर; जुन्या आठवणी सांगताना कोसळले रडू