
महाराष्ट्रातील महत्त्वाचे व मोठे धरण म्हणून उजनी धरणाची ओळख आहे. पावसाळा संपून अडीज महिने होऊनही उजनीतील पाणीसाठा कमी झालेला नाही. उजनी धरणाची ( Uajani Dam) साठवण क्षमता 123 टीएमसीपर्यंत आहे. पावसाळा संपला तेव्हा धरण हाऊसफुल्ल होते. दरम्यान उजनीत अजूनही 100.45 टक्के पाणीसाठा आहे. याचा फायदा अनेक शेतकरी व उद्योगधंद्याना होणार आहे.
ठाकरे गटाला पुन्हा एकदा गळती? आमदार खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत
उजनीच्या पाण्यावर साखर कारखाने, औद्योगिक वसाहती, शेती व शेतीपुरक व्यवसाय, गोड्या पाण्यातील मासेमारी असे अनेक छोटे-मोठे व्यवसाय अवलंबून आहेत. ( Agriculture, Industries, Buisness Depends on Ujani Dam) सोलापूर, माढा, बारामती व आजूबाजूच्या भागात उजनीचे पाणी वापरले जाते. याठिकाणी अनेक कोटींची उलाढाल उजनीच्या पाण्यामुळे होत असते.
“…अन्यथा आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम घ्यावा लागला असता”; त्या प्रसंगातून अजित पवार थोडक्यात बचावले
भीमा नदीतून देखील सोलापूर शहराला पाणी सोडले जाते. येत्या १७ जानेवारीपासून उजनीमधून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. यंदाच्या वर्षी पावसाळा संपूनअडीच महिने होऊनही धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने उन्हाळ्यात धरण मायनस मध्ये जाणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘या’ कारणामुळे महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी शरद पवार अनुपस्थित