विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. 23 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता या तैलचित्राचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याची कार्यक्रमपत्रिका नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही पत्रिका पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख व बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नाही. आता यावर फडणवीसांनी भाष्य केलं आहे.
‘वेड’ चित्रपटामध्ये होणार मोठे बदल; रितेश देशमुखने केली मोठी घोषणा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंचं पत्रिकेमध्ये नाव नाही, याबद्दल मला काही माहित नाही. हा कार्यक्रम सरकारचा नसतो, विधिमंडळ हा कार्यक्रम ठरवतो. त्याच्यामुळे याबद्दल मला काहीही माहिती नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
अमृता फडणवीस यांनी रिल स्टार रियाजसोबत धरला त्यांच्या नवीन पंजाबी गाण्यावर ठेका; पाहा VIDEO
दरम्यान, प्रोटोकॉल नुसार फक्त शासकीय पदावरच असणाऱ्या व्यक्तींची नावे या आमंत्रण पत्रिकेत टाकण्यात आली आहेत. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, विधानसभा अध्यक्ष, विधानसभा उपाध्यक्ष, विधानपरिषद सभापती आणि उपसभापती यांचा समावेश आहे. मात्र पुत्र असूनसुद्धा उद्धव ठाकरेंच ( Uddhav Thackeray) नाव या पत्रिकेत नसल्याने विविध चर्चा सुरू आहेत.
बिग ब्रेकिंग! चालकाचं नियंत्रण सुटल्याने देवदर्शनासाठी निघालेली ट्रॅव्हल्स पलटी; २८ जण जखमी