अवघ्या महाराष्ट्रात गौतमी पाटीलचे (Gautami Patil) नाव घराघरांत पोहोचले आहे. तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटील आणि तिची लावणी सध्या चर्चेचा विषय ठरतोय. राज्यात अनेक ठिकणी गौतमी पाटीलच्या लावणीचे कार्यक्रम होत आहेत. सध्या चर्चेत असलेली ही गौतमी तिच्या एका कार्यक्रमसाठी किती मानधन घेते हे ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.
बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्यात उद्धव ठाकरेंना का डावलले? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
गौतमी पाटील ही मूळची धुळे येथील असून ती अवघ्या 26 वर्षांची आहे. घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे तिने लावणी क्षेत्रात पाऊल ठेवले. पत्रकार परिषदेत माहिती देताना गौतमी पाटील हिने याबद्दल सांगितले असून यावेळी तिने तिची घरची परिस्थिती कथन केली आहे.
‘वेड’ चित्रपटामध्ये होणार मोठे बदल; रितेश देशमुखने केली मोठी घोषणा
गौतमीच्या जन्मापूर्वीच तिचे आई वडील वेगळे झाले होते. तिच्या वडिलांनी काही कारणांमुळे तिच्या आईला नववा महिना सुरू असतानाच सोडून दिले. गौतमीच्या जन्मानंतर तिच्या आईने जॉब केला. बिसलेरी आणि इतर काही कंपन्यांमध्ये काम केलं. मात्र गौतमीचे शिक्षण सुरू असतानाच तिच्या आईचा अपघात झाला. यामुळे आईचे काम सुटले. परिणामतः गौतमीला शिक्षण सोडावे लागले.
अमृता फडणवीस यांनी रिल स्टार रियाजसोबत धरला त्यांच्या नवीन पंजाबी गाण्यावर ठेका; पाहा VIDEO
यामुळे गौतमीने पैसे कमावण्यासाठी ऑर्केस्ट्रामध्ये काम सुरू केले. महेंद्र बनसुळे सर यांच्याकडे ती कामाला होती. नंतर, अकलूज लावणी महोत्सवात गौतमीने बॅक डान्सर म्हणून काम केले तेव्हा तिला ५०० रुपये मानधन मिळाले होते. मात्र आता प्रसिद्धीच्या झोतात आलेली ही गौतमी एका शो साठी दीड ते दोन लाख रूपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
बिग ब्रेकिंग! चालकाचं नियंत्रण सुटल्याने देवदर्शनासाठी निघालेली ट्रॅव्हल्स पलटी; २८ जण जखमी