नोटांचा पाऊस ही आपल्यासाठी फक्त स्वप्नवत कल्पना आहे. मात्र, चीनमध्ये (China) हे सत्यात घडले आहे. चीनमधील एका कुटुंबाने त्यांच्या मुलाच्या वाढदिवसादिवशी चक्क हवेत नोटांचा पाऊस पाडला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होतोय.
राखी सावंतने सुटकेनंतर दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाली, “मला चक्कर येतय, माझा बीपी देखील…”
पूर्व चीनच्या अनहुई ( Anhui) परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाने त्यांच्या घरातील मुलाच्या वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित केली होती. यावेळी या कुटुंबाने घराच्या बाल्कनीमध्ये उभे राहून लाखोंच्या नोटा हवेत उधळल्या आहेत.
PHOTO: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा!
व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे या पार्टीत नातेवाईक, मित्रपरिवार व आसपासचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेव्हा हे सर्व लोक घराच्या लॉन्स मध्ये जमले त्यावेळी अचानक घरातील सदस्यांनी बाल्कनीमधून नोटा हवेत फेकण्यास सुरुवात केली. या हौशी कुटुंबाने तब्बल 2 लाख 40 हजारहून अधिक नोटा उडवल्या आहेत. दरम्यान नोटा पकडण्यासाठी उपस्थित लोकांनी धक्काबुक्की केली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; खासगी बसला भीषण अपघात, १ जागीच ठार
काहींना या कुटुंबाचे कौतुक वाटले, काही लोकांना त्यांच्या श्रीमंतीचा हेवा वाटला. तर काही लोकांनी ही चिनी संस्कृती नाही, पैसे द्यायचे होते तर सन्मानाने द्यायचे होते. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आजच्या दिवसासाठी खास ऑफर; रितेश-जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपट पाहा फक्त ९९ रुपयांत