मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यापासून शिवसेनेचे ठाकरे व शिंदे असे दोन गट पडले. या दोन्ही गटांमध्ये शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण कुणाचा ? यावरून वाद सुरू आहेत. याबाबत काल निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होती. मागील अनेक दिवसांपासून रखडलेला हा निर्णय किमान कालतरी होईल म्हणून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र कालही शिवसेना व धनुष्यबाण नेमका कुणाचा ? यावर निर्णय झाला नसून याबाबतची सुनावणी पुढे ढकलली गेली आहे. या पार्श्वभूमीवर घटनातज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी मोठा दावा केला आहे.
‘मी तुमचा सदैव ऋणी राहीन’; ऋषभ पंतने उघड केली प्राण वाचवणाऱ्या ‘त्या’ दोन व्यक्तींची नावे
उल्हास बापट म्हणाले, राजघटनेच्या दहाव्या शेड्युलनुसार दोन तृतीयांश जर एकावेळी पक्षातून बाहेर पडले आणि दुसऱ्या पक्षामध्ये सामील झाले तरच ते वाचतात नाहीतर ते अपात्र ठरत असतात. यामळे शिवसेनेतून बाहेर पडलेले १६ आमदार हे दोन तृतीयांश नाहीत. त्याचबरोबर ते इतर कोणत्याही पक्षात सामील झालेले नाहीत. त्यामुळे ते अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे आमदार अपात्र ठरले तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री राहता येणार नाही. याचा अर्थ म्हणजेच हे सरकार बरखास्त कोणत्याची शक्यता आहे. असे बापट म्हणाले आहेत.
मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे पोलिसांची थेट देशाच्या पंतप्रधानांवरच मोठी कारवाई
दरम्यान, सोमवारी 23 जानेवारी रोजी शिंदे व ठाकरे गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. या दोन्ही गटांकडून लेखी उत्तरं मिळाल्यानंतर निवडणूक आयोग पुढील सुनावणी ३० जानेवारीला करणार आहे.