कोणतीही गोष्ट सहसहजी मिळत नाही त्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. आपण जर एखाद्या खेळाडूचे जीवन पहिले तर आपल्याला खूप भारी वाटत मात्र त्यामागे देखील त्यांच्या संघर्षाची कहाणी दडलेली असते. आज आपण टीम इंडियातील डॅशिंग खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हार्दिक पांड्याबद्दल माहिती पाहणार आहोत.
‘मी तुमचा सदैव ऋणी राहीन’; ऋषभ पंतने उघड केली प्राण वाचवणाऱ्या ‘त्या’ दोन व्यक्तींची नावे
हार्दिकने टिम इंडियामध्ये खूप मोठं स्थान मिळवलं आहे. टीम इंडियामध्ये स्थान मिळवणं एवढं सोप नव्हतं, त्यासाठी हार्दिकला खूप मोठा संघर्ष करावा लागला आहे. हार्दिक पांड्याचा जन्म गुजरातच्या सूरतमध्ये 11 ऑक्टोबर 1993 ला झाला. त्याच्या कुटुंबाबद्दल पहिले तर त्याची घरची परिस्थिती हलाखीचीच होती. पण परिस्थिती किती हालाखीची असली तरी आईवडील आपल्या मुलांना कधीच काहीही कमी पडू देत नाहीत. तसेच हार्दिकच्या वडिलांनी देखील त्याला क्रिकेटसाठी कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिलेली नाही.
“…तर मुख्यमंत्र्यांसह १६ आमदार अपात्र ठरून हे सरकार कोसळू शकत”; ‘या’ घटनातज्ञांनी केला मोठा दावा
हार्दिकच्या शिक्षणाबाबत आपण पहिले तर त्याला शिक्षणाची जास्त आवड नव्हती. लहानपणापासूनच त्याला क्रिकेटची आवड असंल्यामुळे त्याला अभ्यासाबाबत कधी लळा निर्माण झालाच नाही. तो जास्तीत जास्त क्रिकेटचं खेळायचा त्यामुळे त्याने अभ्यास ही गोष्ट जास्त कधी केलीच नाही. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे शिक्षणात आवड नसल्याने त्याने नववीत तो नापास झाला. आणि नापास होताच त्याने त्याच ठिकाणी त्याचा शैक्षणिक प्रवास थांबवला. शिक्षण थांबवल्यांनतर हार्दिकने आपला पूर्णवेळ क्रिकेटला दिला. त्यावेळी अशी परिस्थिती होती की हार्दिककडे स्वत:च क्रिकेट किट देखील नव्हतं. तो बडोदा क्रिकेट असोसिएशनकडून किट घेऊन सराव करत असे.
मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे पोलिसांची थेट देशाच्या पंतप्रधानांवरच मोठी कारवाई
एका मुलाखतीती हार्दिक पांड्या म्हणाला होता की, एक काळ असा होता की, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. पैसे नसल्याने केवळ मॅगी खाऊन दिवस काढले. क्रिकेट खेळण्यासाठी त्याने ट्रकने देखील प्रवास केला आहे. असे त्याने सांगितले. मात्र आता ज्या हार्दिक पांड्याची एकेकाळी जेवणाची चिंता होती त्याची आज श्रीमंत खेळाडूंच्या यादीमध्ये गणना होते. हार्दिकने दमदार गोलंदाजी, आक्रमक फलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्याने टीम इंडियामध्ये आपलं एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे.