
मागच्या काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांचा अपघात झाला होता. यानंतर त्यांच्यावर योग्य तो उपचार होऊन त्यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी धनंजय मुंडेंची (Dhananjay Munde) भेट घेऊन त्यांच्या तब्येतीविषयी विचारपूस केली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
एसटी बसवर स्टिकर, जाहिरात, चिकटविण्यास बंदी!
पंकजा मुंडे (Pankaja Munde) या बीडमध्ये (Beed) नाराज असल्याच्या चर्चा सतत सुरु आहेत. आणि नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राजकीय वर्तुळात देखील याच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.
सुशांत सिंगबद्दल अभिनेत्री कियारा अडवाणीने केला मोठा खुलासा; म्हणाली, “तो फक्त…”
दरम्यान, धनंजय मुंडे यांचा परळीमध्ये ४ जानेवारीला अपघात झाला होता. या अपघातामध्ये मुंडेंची सातवी आणि आठवी बरगडी फ्रॅक्चर झाली होती. आता त्यांच्यावर उपचार झाले असून त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. आज दुपारी फडणवीसांनी धनंजय मुंडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.
क्रिकेट किटही उधारीवर, दोन वेळच्या जेवणाची भ्रांती, वाचा हार्दिक पांड्याच्या संघर्षमय जीवनाची कहाणी