
पुणे : ‘छडी लागे छम छम विद्या येई घमघम’ असे म्हंटले जाते. मात्र आजकाल विद्यार्थ्यांना मारणे शिक्षकांच्या अंगलट येऊ शकते. जुन्नर येथील एका शिक्षकाला विद्यार्थ्याला मारहाण करणे चांगलेच महागात पडले आहे. शिक्षकावर शेरोशायरी केल्याच्या गैरसमजातून हा प्रकार घडला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
साखरपुडा अनंत अंबानीचा मात्र चर्चा ऐश्वर्या राय बच्चनच्या लेकीची
पुण्याच्या जुन्नर ( Junnar) तालुक्यातील आळेफाटा येथील ज्ञानेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. काल ( दि. 21) सकाळी ज्युनिअर कॉलेजमधील मुलांच्या घोळक्यातील मुलाने शिक्षकांना ( Teacher) पाहून शेरोशायरी केली. यामुळे चिडलेल्या शिक्षकाने कोणतीही शहानिशा न करता एका विद्यार्थ्याचे केस पकडून त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. दरम्यान हा विद्यार्थी “सर, माझी काही चूक नाही” असे वारंवार म्हणून देखील शिक्षक थांबले नाहीत.
शेतकऱ्यांना लग्नासाठी मुलगी मिळणे मुश्किल; केंद्रीय मूल्य आयोगाच्या बैठकीत शेतकऱ्यांनी मांडली व्यथा
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी व्हिडीओ करून सोशल मीडियावर अपलोड केला. यामुळे विद्यार्थ्याला मारहाण करणे शिक्षकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच महाविद्याल प्रशासनाने याबाबत बैठक देखील बोलावली आहे. पोलिसांनी मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केले आहे.
हौसेला मोल नाही, मुलाच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबाने उधळले लाखो रुपये