शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विधीमंडळामध्ये बाबासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका काही दिवसांपूर्वी प्रसिध्द करण्यात आली होती. यामध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव न्हवते. त्यामुळे या कार्यक्रमास ठाकरे कुटुंबीय उपस्थित राहणार का ? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
धक्कादायक! तरुणाने विवाहितेवर केला बलात्कार वरून म्हणाला की, आमचे हेच काम आहे…
हा राजकीय कार्यक्रम असल्याने उद्धव ठाकरे याला जाणार नाहीत. अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणाच्या कार्यक्रमावर टीका केली आहे. “गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्राच अनावरण झालं,असे आजोबा म्हणतील” अशी टीका आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केली आहे.
कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी सिकंदरला दिला मोठा सल्ला; म्हणाले…
तसेच घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझ्या आजोबांच्या तैलचित्रांचं अनावरण होणार आहे. असे म्हणत आदित्य ठाकरेंनी या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. ” एवढी कशाची भीती होती म्हणून सुरतला पळून गेलात, असं काय खाल्लं होतं तुम्ही, जे अपचन झाल्यानंतर पचन होण्यासाठी एवढ्या दूर जावं लागलं?’ असा प्रश्न देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
‘या’ चित्रपटासाठी कंगना रनौतने गहाण ठेवली मालमत्ता; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती