
पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या उर्वरित आयुष्यासाठीची बचत असते. दरम्यान पेन्शन घेणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. अगामी काळात संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांचे मासिक उत्पन्न विचारात न घेता त्यांची पेन्शन योजना वाढली जाऊ शकते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून याबाबतची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. महत्त्वाची बाबा म्हणजे ही योजना वैयक्तिक योगदानावर आधारित असणार आहे.
कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी सिकंदरला दिला मोठा सल्ला; म्हणाले…
वयाच्या 60 वर्षानंतर प्रत्येक कामगाराला किमान 3 हजार रुपये पेन्शन या योजनेद्वारे सुनिश्चित केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेला युनिव्हर्सल पेन्शन स्कीम (UPS) असे म्हटले जाऊ शकते. सध्याची कर्मचारी पेन्शन योजना (EPS) संघटित, असंघटित/स्वयं-रोजगार असलेल्या कामगारांच्या वर्गाला कव्हर करत नाही.
देशातील 80 टक्के तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार; शरद पवारांचे मोठे वक्तव्य
यामुळे UPS योजना मंजूर झाल्यास असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही त्यांच्या आवडीची कोणतीही रक्कम जमा करून निश्चित रक्कम मिळेल. यामध्ये सेवानिवृत्ती निवृत्ती वेतन, विधवा निवृत्ती वेतन, मुलांचे निवृत्ती वेतन आणि अपंगत्व निवृत्तीवेतन यांचा समावेश होईल. दरम्यान पेन्शन सेवेचा फायदा 10 वर्षावरून 15 वर्षांपर्यंत वाढला जाऊ शकतो.
कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी सिकंदरला दिला मोठा सल्ला; म्हणाले…