
बॉलीवूड मध्ये अभिनेते सुनील शेट्टी यांचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. नुकतीच त्यांनी आपल्या लेकीच्या लग्नाबाबत मराठीमधून माहिती दिली होती. सध्या त्यांची मुलगी व अभिनेत्री आथिया शेट्टी (Aathiya Shetty Wedding) व क्रिकेटर के एल राहूल ( KL Rahul) यांनी काल ( दि.23) लग्नगाठ बांधली. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्महाऊस मध्ये दाक्षिणात्य पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी ठराविक लोकांचीच उपस्थिती होती.
खुशखबर! सर्वच कर्मचाऱ्यांना मिळणार मासिक 3 हजारांची पेन्शन
अथिया-राहुल मागील 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 साली एका मित्राच्या पार्टीत केएल राहुलने अथियाला पाहिलं होतं. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आणि आता ते दोघे नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत. अवघ्या 100 लोकांच्या उपस्थितीमध्ये या दोघांचा विवाह सोहळा पार पडला आहे. यावेळी अर्जुन कपूरची बहिण अंशुला कपूर, जॅकी श्रॉफची लेक कृष्णा श्रॉफ, अनुपम खेर, वरुण ऐरन, ईशांत शर्मा आणि आदित्य सील या सेलिब्रिटींनीदेखील हजेरी लावली होती.
देशातील 80 टक्के तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार; शरद पवारांचे मोठे वक्तव्य
दरम्यान लग्नाच्या रिसेप्शन बद्दल विचारण्यात आले असता अभिनेते सुनील शेट्टी ( Sunil Shetty) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. के एल राहुलच्या आयपीएल सामन्यांनंतर रिसेप्शन होणार आहे. यावेळी ते म्हणाले की, “केएल राहुल हा माझा जावई नसून मुलगाच आहे. मी जरी नात्याने त्याचा सासरा असलो तरी तो माझा मुलगाच आहे.”