सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विदर्भातील (Vidarbha) एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही विद्यार्थिनी बारावीला असल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रेकिंग! आदिल खान गुन्हेगार? राखी सावंतने केला अत्यंत मोठा खुलासा; म्हणाली…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आय एम सॉरी…लव्ह यू मम्मी’ (‘I’m sorry…love you mommy) असा मेसेज पाठवून बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही विद्यार्थिनी तिच्या आजीकडे शिक्षणासाठी होती. मात्र तिने अचानक आत्महत्या केली यामुळे तिच्या कुटुंबवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तनिष्का असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती भंडारामधील तुमसरमध्ये आजीकडे शिकण्यासाठी राहत होती. तनिष्का ही तुमसरमधील हसारातील मातोश्री विद्या मंदिरात ती बारावी विज्ञान शाखेत शिकत होती. दरम्यान, तिने आत्महत्या का केली याच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत हायहोल्टेज ड्रामा! उमेदवारी न दिल्याने राहुल कलाटे करणार बंडखोरी