23 वर्षीय दिव्यांग तरुणीवर किशोरवयीन मुलाचा दोन दिवस बलात्कार

A 23-year-old disabled girl was raped by a teenager for two days

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) 23 वर्षीय दिव्यांग तरुणीवर शेजारी राहणाऱ्या किशोरवयीन मुलानं बलात्कार (rape) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. दरम्यान पोलिसांनी 14 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले असून आज त्याला बालन्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. 23 वर्षीय दिव्यांग तरुणी (Disabled young woman) तिची आई आणि मावशीसोबत पिंपरी चिंचवडमध्ये राहते. आई आणि मावशी दोघीही दिवस कामावर जातात. मग ती दिव्यांग तरुणी दिवसभर एकटीच घरी असते.

“मुरजी काकांचे आमच्यावर खूप उपकार..”, टाईमपास’फेम दगडूचे भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत वक्तव्य

दरम्यान घरी कोणी नसल्याचा फायदा घेत शेजारचा किशोरवयीन मुलगा (teenage boy) घरात घुसला. मुलाने या तरुणीवर दोन दिवशी बलात्कार केला. तिची मावशी बुधवारी दुपारी घरी परतली असता तरुणी अस्वस्थ दिसली. इतकंच नाही तर राहत्या खोलीचा पडदा देखील व्यवस्थित लावल्याचे मावशीला आढळले. पण ही तरुणी दिव्यांग असल्यामुळे ती हे काम करू शकत नाही. म्हणून तिच्या मावशी आणि आईने आजूबाजूला चौकशी केली.

Abdu Rozic: सुप्रसिद्ध गायक ए आर रहमान देखील आहेत त्याचे फॅन ‘तो’ अब्दू रोझिक नक्की आहे तरी कोण?

त्यावेळी त्या दोघींना शेजारच्या किशोरवयीन मुलाने तरुणीवर बलात्कार केल्याचा संशय त्यांना आला. त्यानंतर आई आणि मावशी दोघींनीही पिंपरी चिंचवड पोलिस (police) ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीत आरोपीने 16 आणि 18 मे रोजी तरुणीचे कुटुंबीय घरी नसताना तिच्यावर दोनवेळा बलात्कार केल्याची कबुली दिली. चौकशीनंतर आरोपी मुलाला अटक करण्यात आली. दरम्यान पुढील कारवाईसाठी आरोपी मुलाला बालन्यायालयासमोर हजर करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं.

“नोकरी नाही मिळाली म्हणून…”, बी कॉम इडलीवाल्याची प्रेरणादायक कथा; वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *