सध्या एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पत्नी तसेच सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून श्रीगोंद्यातील (Shrigonda) रहिवाशी असलेला व्यक्ती जो पुण्यातील (Pune) जावय आहे. त्याने गळफास घेऊन, आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मोठी बातमी! उसाच्या गाळपात बारामती अॅग्रो सर्वात पुढे; वाचा सविस्तर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर निवृत्ती नाईक (Sameer Nivritti Naik) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते ३८ वर्षांचे होते. यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नी, आणि सासरच्या लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सरकारी रुग्णालयातील नर्सकडून महिला रुग्णाला शिवीगाळ
समीर पुण्यातील खडकीमधील (Khadki) दारुगोळा कारखान्यात कामाला होते. समीर आणि त्यांची पत्नी कायम भांडण व्हायचे त्यांची पत्नी पैशांची देखील मागणी करायची. पत्नी आणि नातेवाईकांच्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणाबाबत पोलीस यंत्रणा (Police system) तपास करत आहे.