Site icon e लोकहित | Marathi News

2024 च्या निवडणुकीत कोण जिंकणार यावरून कर्जत-जामखेड मध्ये लागली एक लाखाची पैज!

A bet of one lakh was made in Karjat-Jamkhed on who will win the 2024 elections!

महाराष्ट्राच्या राजकारणात अगामी 2024 च्या विधानसभा निवडणूकांचे वारे वाहू लागले आहे. राज्यातील सर्वच पक्षांनी यासाठी तयारी सुरू केली असून मोर्चेबांधणी व डावपेचांचा सुरुवात झाली आहे. मागील विधानसभा निवडणूकांनंतर महाविकास आघाडीची सत्ता होती. मात्र काही महिन्यांपूर्वी राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. यामुळे अगामी निवडणुकांमध्ये विजयाचा झेंडा कोण रोवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

‘त्या’ यादीतील नेत्यांवर कारवाई सुरू; अनिल परब यांची संपत्ती जप्त

राज्यातील मतदारसंघ व गावांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेड मतदारसंघात तर चक्क एक लाखांची पैज लागली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत-जामखेड ( Karjat- Jamkhed) मतदारसंघातून कोण बाजी मारणार ? याबाबत सगळीकडे दावे प्रतिदावे केले जात आहेत. यावरून मतदारसंघातील दोन निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तब्बल एक लाख रुपयांची पैज लागली आहे.

गैरसमज मिटले! महावितरणचे खासगीकरण होणार नाही ; सरकार व संघटनांची बैठक पार पडली

या पैजेची राज्यभरात चर्चा सुरू आहे. 2019 मध्ये रोहित पवार यांनी भाजपचे राम शिंदे यांचा पराभव केला होता. इतकंच नाही तर विजयानंतर स्वतः त्यांनी राम शिंदे यांच्या घरी जाऊन आशीर्वाद घेतला होता. यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलत गेली आहेत. मात्र आता 2024 मध्ये कर्जत -जामखेड मतदारसंघातून कोण जिंकणार? रोहित पवार ( Rohit Pawar) की राम शिंदे ( Ram Shinde) अशी ही पैंज आहे. रोहित पवार यांचे कट्टर समर्थक विशाल डोळे आणि राम शिंदे यांचे समर्थक जायभाये यांच्यात ही पैज लागली आहे. या दोघांनीही विष्णू जायभाय या मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीकडे एक लाखाचे चेक जमा केले आहेत.

मशरूम ची शेती म्हणजे मालामाल कार्यक्रम ! होतो लाखो रुपयांचा फायदा

Spread the love
Exit mobile version