
Loan EMI । प्रत्येकाला आपल्या स्वप्नातले घर खरेदी करण्याची इच्छा असते. किंवा इतर वस्तू त्यांना खरेदी करायच्या असतात. त्यासाठी ते दिवस-रात्र मेहनत करतात. परंतु प्रत्येकाकडे ती वस्तू खरेदी करत असताना पुरेशा प्रमाणात पैसे असतातच असे नाही. अनेकदा त्यांना पैशांची कमतरता जाणवते. परंतु आता बँकांकडून (Bank) मिळत असणाऱ्या कर्जामुळे (Bank Loan) कोणत्याही वस्तूची खरेदी करणे खूप सोयीस्कर झाले आहे. (Latest Marathi News)
परंतु अनेकांना ईएमआय (EMI) वेळेत भरता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशातच आता सर्वसामान्य जनतेला चिंतेत टाकणारी एक बातमी आहे. कारण काही मोठ्या बँकांनी EMI च्या हप्त्यात वाढ (Bank EMI) केली आहे. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडियासह देशातील सर्वोच्च बँकांनी निधी आधारित कर्जाच्या दरात वाढ केली आहे.
Gadar 2 Box Office Collection । आत्तापर्यंत गदर २ चित्रपटाने केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
एचडीएफसी बँकेकडून या महिन्यापासून निवडक कालावधीसाठी MCLR ची बेंचमार्क किरकोळ किंमत 15 bps ने वाढवली आहे. बँक ऑफ बडोदाने MCLR वाढवला असून अनेक कालावधीसाठी त्यांचे बेंचमार्क कर्जाच्या दरात 5 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. तर ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडियाने MCLR मध्ये बदल केला आहे.
Petrol Price । सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! पेट्रोलचे दर होणार कमी, सरकारचा मोठा निर्णय