आजच्या होणाऱ्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स ( Kolkata Night Riders ) मॅच मध्ये रोहित शर्मा खेळणार नाही. दुखापत झाल्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा बाहेर झाला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स समोर मोठे संकट उभे राहिले आहे. वानखेडे स्टेडियम मधील मुंबई इंडियन्सची ही पहिली मॅच असून पहिल्याच मॅचला त्यांना मोठा धक्का बसलेला आहे.
राज कुंद्राचा अतरंगी अवतार पाहून नेटकरी म्हणाले, “याने तर उर्फीलाही…”
( MI ) vs ( KKR ) यांच्यातील हा १६ व्या मोसमातील २२ वा सामना खेळवला जात आहे. या सामन्याचे आयोजन वानखेडे स्टेडियम वर करण्यात आले आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याची तयारी दाखवली आहे. परंतु या सामन्याआधीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना मुंबईमध्ये खेळला जात असून घरच्या मैदानावर रोहित शर्माला खेळता येऊ शकणार नाही.
राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता फुटणार? भाजपकडून आली ऑफर! थेट मोदींनीच केले कौतुक
मैदानावरती टॉस साठी दोन्ही संघातील कर्णधार आले होते, नितेश राणा कोलकत्ता कडून तर मुंबईकडून रोहित शर्मा येणार असं अपेक्षित होतं. परंतु सूर्यकुमार यादव मैदानात आला, त्यामुळे चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. सूर्य कुमारने टॉस जिंकल्यानंतर रोहितच्या दुखापती बद्दल स्पष्टीकरण दिलं व तो खेळणार नाही असं सांगितलं.
अजित पवारांचा निर्णय पक्का? तिथी लवकरच काढली जाईल; गुलाबराव पाटील यांचे सूचक वक्तव्य