Hafiz Saeed Son । पाकिस्तानला मोठा धक्का! मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदच्या मुलाची हत्या?

A big blow to Pakistan is the murder of the son of Mumbai attack mastermind Hafiz Saeed?

Hafiz Saeed Son । हाफिज सईद (Hafiz Saeed) याचा अनेक देशातील दहशतवादी (Terrorist) कारवाया करण्यात हस्तक्षेप असल्याचे उघड झाले आहे. त्याने भारतासह अमेरिका, युरोपीय संघ, ऑस्ट्रेलिया, रशियामध्ये हल्ले घडवून आणले होते.तो दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयब्बाचा (LET) सहसंस्थापक आहे. हाफिज हा मुंबई हल्ल्याचा (Mumbai attack) सूत्रधार असून त्याने केलेल्या हल्ल्यात 18 पोलीस आणि 166 नागरिकांना जीव गमवावा लागला तर 300 अधिक जण जखमी झाले होते. (Latest Marathi News)

Gautami Patil । गौतमीचा कार्यक्रम आयोजित करणारे घरी जातील, शिक्षण मंत्र्यांचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

अशातच आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. हाफिजचा मुलगा कमालुद्दीन सईद (Kamaluddin Saeed) हा 26 ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. पेशावरमध्ये एका कारमधून त्याचे अपहरण केले. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना त्याचा शोध घेत होती. परंतु आता त्याची हत्या (Kamaluddin Saeed Killed) झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Voter ID Card । मस्तच! आता मोबाइलच्या मदतीने तयार करता येणार मतदान कार्ड

सोशल मीडियावर कमालुद्दीनचा मृतदेह पेशावर जवळील जब्बा घाटीत सापडल्याचा दावा केला जात आहे. परंतु अजूनही याविषयी अधिकृत माहिती समोर आली नाही. दरम्यान, अमेरिकेकडून हाफिजवर 10 दशलक्ष अमेरिकन डॉलरचे बक्षिस ठेवण्यात आले आहे. त्याची मुरीदके हे संघटना जमात-उद-दावाचे मुख्यालय असून येथे हाफिज मोठा मदरसा चालवतो आणि याच ठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते.

World Cup 2023 । दोन दिवसात 3 सामने रद्द झाल्यानं वर्ल्डकप सामन्यांच टेन्शन वाढलं

Spread the love