आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून जोरदार तयारी चालू झाली आहे. लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्ष उरलं आहे तरीही तयारी चालू झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीत आता भाजपचे (BJP) राहुल कुल (Rahul kul) यांची एन्ट्री झाली आहे.
भाजपचे राहुल कुल आता बारामती लोकसभा मतदारसंघाची धुरा सांभाळणार आहेत. महाराष्ट्रामधील 48 लोकसभा मतदार संघ निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी जाहीर केल्या. त्यामध्ये आमदार राहुल कुल यांना बारामती मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
रोहित शर्माने भरमैदानात ‘या’ बड्या खेळाडूला दिल्या शिव्या, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मागच्या वेळेस लोकसभा निवडणुकीत भाजपच्या वतीने आमदार राहुल कुल यांची पत्नी कांचन कुल (Kanchan Kul) यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी पवारांना रोखण्यात त्यांना यश आलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आता राहुल कुल यांना ही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता राहुल कुल यांची जबाबदारी खूप वाढली आहे.
मीरा रोड हत्याकांडाबाबत आरोपीने केले अनेक धक्कादायक खुलासे, पोलिसही चक्रावले…
दरम्यानच, चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यामध्ये मनसेला खूप मोठा धक्का बसला आहे. वरोरा विधानसभेत मनसेच्या तिकिटावर 2019 ची निवडणूक लढवणारे रमेश राजूरकर (Ramesh rajurkar) यांना भाजपने विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. 13 जूनला राजूरकरांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.
गौतमी पाटीलचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले, “तू तर खूपच…”