सध्या सर्वत्र आयपीएलचे (IPL 2023) वारे वाहत आहे. जगातील सर्व क्रिकेटप्रेमींसाठी आयपीएल ही भारी मेजवानी असते. दरम्यान आयपीएल मधील दोन दमदार टिम्स म्हणजेच मुंबई इंडियन्स (MI) व चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात नुकताच सामना पार पडला. या सामन्यात मुबंई इंडियन्सचा मिस्टर 360 म्हणजेच उजव्या हाताचा फलंदाज सुर्यकुमार यादव ( Surykumar Yadav) फार लवकर बाद झाला.
कीर्तनकार महाराजांनी ‘त्या’ गरम तव्यावर बसणाऱ्या बाबाची प्रात्यक्षिक करत पोलखोल केली!
त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात देखील सुर्यकुमार यादव शारीरिक दुखापत झाल्याने शून्यात बाद झाला. यामुळे सर्वत्र त्याच्यासाठी हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर या सामन्या दरम्यानच्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये सुर्यकुमार यादव गंभीर जखमी झालेला दिसत आहे.
ब्रेकिंग! प्रसिद्ध कोरियन अभिनेत्रीचा मृत्यू; वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सामना खेळताना क्षेत्ररक्षण करता करता झेल घेण्याच्या प्रयत्नात असताना सुर्यकुमार यादवच्या डोळ्यात चेंडू लागला. ही दुखापत फार गंभीर होती. यामुळे त्याला मैदान सोडावे लागले व तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली. पुढील सामान्यासाठी सुर्यकुमार तंदरुस्त आहे की नाही याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
खरंतर खेळात दुखापत होणे काही नवीन नाही. मात्र ही दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने सुर्यकुमारसाठी अगामी काळात अडचणी निर्माण होणार आहेत. एवढेच नाही तर सुर्यकुमारला दुखापत झाल्याने मुंबई इंडियन्स संघावर देखील चांगलाच परिणाम होणार आहेत.
“एकवेळ असं वाटत होत आयुष्यात काहीच राहील नाही, सगळं संपल…” गौतमीने संगितला तो भयानक किस्सा