मुंबई : सध्या आशिया चषक 2022 सुरू आहे.दरम्यान या मोहिमेवेळी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून देणारा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला येणारे आशिया चषक सामने खेळता येणार नाही. याच मुख्य कारण म्हणजे रवींद्र जाडेजाला गुडघ्याला दुखापत झाली आहे. म्हणून या दुखापतीमुळे जाडेजा पुढील सामन्यात खेळताना दिसणार नाही. महत्वाची बाब म्हणजे जडेजाच्या जागी आता डावखुऱ्या अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे.
बीसीसीआयकडून अधिकृत घोषणा बीसीसीआयनं अधिकृतरित्या याची घोषणा केली आहे.हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यानंतर जाडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती.यावेळी आता जडेजा खेळणार नाही म्हंटल्यावर भारताला थोडी टेन्शनची बाजू समोर आली आहे कारण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जाडेजानं 35 धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर त्यानं हार्दिकसोबत केलेल्या भागीदारीमुळे भारतानं हा सामना 5 विकेट्सनी जिंकला होता.
हे तिघ स्टँडबाय खेळाडू
जाडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने बीसीसीआयचं वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेऊन आहे.दरम्यान भारतीय संघाने आशिया चषकावेळी भारतीय संघाची निवड करताना अक्षर पटेल, श्रेयस अय्यर आणि दीपक चहर या तिघांना स्टँडबाय खेळाडू म्हणून ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे जाडेजाच्या जागी अक्षर पटेलला संघात घेतल्याची माहिती बीसीसीआयनं दिली आहे.
Indian Navy: भारतीय नौदलाकडून शिवरायांचा गौरव; राजमुद्रेतून प्रेरणा घेऊन केलं नव्या चिन्हाच अनावरण