राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार आहे. लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha elections) पार पडतील. या महायुतीचा फायदा सरकारला आगामी निवडणुकांमध्ये होईल. या महायुतीविरुद्ध लढण्यासाठी विरोधकही तितक्याच जोमाने तयारी करत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आपल्याला कडवी टक्कर पाहायला मिळेल. परंतु निवडणुकांपूर्वीच महायुतीला पहिला मोठा धक्का बसला आहे. (Latest Marathi News)
Animal Husbandry Business : ‘ही’ गाई देते 800 लिटर दूध, जाणून घ्या नेमकी काय आहे खासियत?
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. दलित आणि धनगर समाजामध्ये जानकर यांच्या पक्षाचा चांगलाच प्रभाव आहे. सध्या ते संपूर्ण राज्यभर पक्षबांधणी करत आहेत. विशेषतः त्यांना ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज सांगली शहरामध्ये ही जनसुराज्य यात्रा दाखल झाली असता त्यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.
प्रसारमाध्यमाशी बोलताना महादेव जानकर म्हणाले की, “कुणाच्याही कुबड्या न घेता राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढवणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे न विकणारा समाज तयार झाला तर न विकणारा नेता देखील तयार होतो. त्यासाठीच संपूर्ण राज्यात आमच्या रॅली सुरु आहे”, असं जानकर यांनी स्पष्ट केले. परंतु त्यांच्या या निर्णयाचा सर्वात मोठा फटका महायुतीला बसणार आहे.