एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यावेळी महाविकास आघाडी सरकार मधील शिवसेनेचे ४० आमदार बाहेर पडले होते. मात्र शिंदे गटामध्ये काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यामध्येच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसलाय.
मोठी बातमी! गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार होणार
कणकवलीमधील शिंदे गटाच्या (Shinde group) दोन कार्यकर्त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना नेते सतीश सावंत (Satish Sawant) आणि जिल्हा युवा सेनाप्रमुख सुशांत नाईक (Sushant Naik) यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मुलीच्या जन्मानंतर आलियाला पाहून चाहते खुश; सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल
दरम्यान, मागच्या काही दिवसांपूर्वीच युवासेनेचे कार्यकर्ते प्रज्योत मोहिरे आणि सुजय पाटणकर यांनी शिंदे गटातमध्ये प्रवेश केला होता. पण त्यांनी लगेच काही दिवसातच पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला. शिंदे गटात गेलेले कार्यकर्ते पुन्हा एकदा ठाकरे गटाकडे जाताना दिसत आहेत. या कार्यकर्त्याने शिवसेना नेते स्वागत करताना दिसून येत आहेत.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पिकांसाठी लागणारी कीटकनाशके आता थेट बांधावर मिळणार