World Cup 2023 । क्रिकेटप्रेमी बऱ्याच दिवसांपासून आयसीसी वनडे वर्ल्ड कप (ICC ODI World Cup) स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. या स्पर्धेपूर्वी खेळाडूंचा सराव व्हावा, त्यासाठी अनेक संघ द्विपक्षीय-त्रिपक्षीय एकदिवसीय मालिका खेळत आहेत. परंतु या सामन्यांदरम्यान संघातील खेळाडूंना दुखापत झाली आहे तर काही खेळाडूंच्या अगोदरच दुखापतींनी डोके वर काढले आहे. (World Cup)
NCP । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या ‘त्या’ पाच आमदारांविरोधात कार्यवाही सुरु
दक्षिण आफ्रिकेला (South Africa) मोठा धक्का बसला आहे. कारण संघातील स्टार खेळाडू एन्रिच नॉर्किया (Enrich Norcia) आणि सिसांडा मगाला (Sisanda Magala) यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू स्पर्धेबाहेर झाले आहेत. नॉर्कियाला पाठीची दुखापत झाली असून मंगाला याच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. दक्षिण आफ्रिका निवड समितीने तातडीने या खेळाडूंच्या जागी दुसऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे.
Gold Silver Rate Today । खरेदीदारांनो.. करा घाई! सणासुदीच्या काळात सोने-चांदीची कमालीची घसरण
संघातील महत्त्वाचे खेळाडू दुखापतीच्या कचाट्यात सापडले असल्याने टीम मॅनेजमेंटचंही टेन्शन वाढलं आहे. हा संघ उद्या भारतात दाखल होत आहे. दक्षिण आफ्रिका निवड समितीने वेगवान गोलंदाज फेलुकवायो आणि लिझाड विलियम्स यांना संघात स्थान दिले आहे. या दोघांच्या कामगिरीकडे संघाचे विशेष लक्ष असेल.
Khichdi Scam Case । कथित खिचडी घोटाळा, ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकरांची पाच तास कसून चौकशी
असा आहे संघ :
टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, जेराल्ड कोएत्झी, रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक, मार्को जॅन्सन, सिसांडा मागाला, केशव महाराज, एडन मार्कराम, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, रॅसी वन डेर डुसेन आणि तबरेझ शम्सी.
Ganeshotsav । महाराष्ट्रातील ‘या’ गावात कोणाच्याच घरी केली जात नाही गणरायाची प्रतिष्ठापना, कारण..