एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला एक वर्ष होऊन गेले तरीही ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. अजूनही त्यांच्या गटाची गळती सुरूच आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा परिणाम पाहायला मिळेल. अशातच आता ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. (Latest Martahi News)
नुकताच संसदेमध्ये मोदी सरकार (Modi Govt) विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावेळी शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या खासदारांना व्हीप बजावण्यात आला होता. परंतु हा व्हीप ठाकरे गटाच्या खासदारांनी पाळला नाही. त्यामुळे आता या गटाच्या खासदारांवर कारवाई केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे शिंदे गटाच्या खासदाराकडूनच त्याबाबत दावा केला आहे.
Havaman Andaj । राज्यात 13 ऑगस्टपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार? पावसासाठी पोषक वातावरण तयार
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी ते म्हणाले की, “लोकसभेचा (Loksabha) अविश्वास ठरावावेळी शिवसेनेच्या खासदारांना व्हीप पाठवण्यात आला होता. परंतु त्यावेळी हे खासदार गैरहजर राहिले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे,” असा दावा शेवाळे यांनी केला आहे.
Ved । कौतुकास्पद! रितेश देशमुखच्या ‘वेड’निमित्त स्टार प्रवाह वाहिनीने केली अनोख्या विक्रमाची नोंद
जर ठाकरे गटाच्या या खासदारांवर कारवाई झाली तर उद्धव ठाकरे यांना खूप मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे आता या खासदारांवर कारवाई होणार की नाही? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Tomato Price Hike । नारायणगावचे टोमॅटो पुन्हा चर्चेत! किलोला मिळतोय ‘इतका’ भाव
हे ही पहा