ठाकरे गटाला मोठा धक्का! सेनेचं कार्यालय मिळालं शिंदे गटाला

A big blow to the Thackeray group! Shinde group got the Sena office

मुंबई : नागपूर हिवाळी अधिवेशन (Nagpur Winter Session) कालपासून चालू झाले आहे. यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यामध्ये होणार वादविवाद आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये एक महत्वाची बातमी म्हणजे शिंदे गटाला जुनं कार्यालय हे मिळालं त्यामुळे शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढून टाकण्यात आले आहेत.

भूमीहीन कुटुंबांना हक्काच्या जमिनी मिळणार? सरकारने ठराव मंजूर केल्याची रामदास आठवले यांनी दिली माहिती!

नागपूर विधानभवनामध्ये दोन्ही पक्षांना वेगवेगळं कार्यालय देण्यात आले आहे. जून शिवसेनेचे कार्यालय शिंदेंच्या शिंदे गटाला मिळाल्याने त्या कार्यालयामधील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे फोटो देखील काढण्यात आले आहेत.

साऊथ सुपरस्टार प्रभासने लग्नाबद्दल केला मोठा खुलासा

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढून या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे (Anand Dighe) यांचे फोटो लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर या कार्यालयाबाहेर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यालय असा फलक देखील लावण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

“भांडवलवादी सरकारचे जनतेविरुद्ध अघोषित युद्ध सुरूच” – हिमांशू कुमार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *