Maharashtra Politics । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत (BJP) युती केल्यानंतर राज्याच्या राजकारणाने वेगळे वळण घेतले आहे. शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. परंतु अनेक नेते ठाकरे गट सोडून शिंदे गटात जात आहेत. ठाकरे गटाच्या अडचणी संपता संपत नाहीत. ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)
ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hiray) यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी भोपाळमधून ताब्यात घेतलं आहे. रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसाठी कर्ज घेण्याकरिता बनावट दस्तऐवज तयार करून जिल्हा बँकेची तब्बल 7 कोटी 46 लाख रुपयांचे कर्ज घेऊन परतफेड न करता फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई (Advay Hiray Arrested) केली आहे.
काल रात्री मालेगावच्या रमजानपूरा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणल्यानंतर अटक केली आहे. आज त्यांना मालेगावच्या न्यायालयात हजर केले जाईल. दरम्यान, 27 जानेवारी रोजी अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. उत्तर महाराष्ट्रात अद्वय हिरे यांचा दबदबा आहे. राज्यात लवकरच निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.