Site icon e लोकहित | Marathi News

ग्राहकांच्या खिशाला लागणार मोठी कात्री! सीएनजी दरात होणार वाढ?

A big cut for customers' pockets! CNG price increase?

दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. या महागाईचा फटका सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. इंधन दर वाढीने तर लोक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल, डिझेल यांच्या किंमतीपाठोपाठ सीएनजी ( CNG) सुद्धा लोकांना महागाईचा झटका देत आहे. राज्यातील दरवाढी नंतर देशभरात सीएनजीची दरवाढ होण्याचा धोका आहे. मागील काही दिवसांपासून सतत सीएनजीच्या दरात वाढ होत आहे.

कार्यकर्त्यांनी घातला तुफान राडा; स्वतः गौतमी पाटीलनेच थांबवला कार्यक्रम

आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही शहरांमध्ये सीएनजी आणि डिझेलच्या दरात फारसा फरक राहिलेला नाही. गुजरातमध्ये नुकतीच सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. अदानी समूहाच्या अदानी टोटल गॅसने ( Adani Total Gas) सीएनजीच्या दरात एक रुपयाने वाढ केली असली, तरी गुजरात गॅसपेक्षा हा दर कमी आहे. काही दिवसांपूर्वी राज्यसरकारच्या गुजरात गॅसने सीएनजीच्या दरात 3.5 प्रतिकिलो इतकी वाढ केली होती.

आत्ताची सर्वात मोठी बातमी! बच्चू कडू यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवले

त्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गुजरात गॅसने 4 जानेवारी 2023 रोजी सीएनजीच्या दरात आणखी वाढ केली होती. यामुळे सीएनजी गॅसच्या दरात 5 टक्क्यांची वाढ झाली होती. यानंतर गुजरात गॅस सीएनजीचा दर प्रतिकिलो 78.52 रुपये इतका झाला होता. महाराष्ट्रात देखील सीएनजीचे सर 80 रुपये किलोंपेक्षा जास्त आहेत. त्यात हे दर आणखी वाढले तर ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. ( Increasing rates of CNG)

स्वारद फाउंडेशन आयोजित उद्योजकता मार्गदर्शन मेळावा आणि रक्तदान शिबिर उत्साहात पार!

Spread the love
Exit mobile version