राज्य सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी

A big decision of the state government, the farmers who have taken loans from 'this' bank will get complete loan waiver

राज्य सरकारने (State government) भू-विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची (Farmers) संपूर्ण कर्जमाफी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गुरुवारी (ता. २०) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा व भू विकास बँकेच्या (Land Development Bank) मालमत्तांचे शासनाकडे हस्तांतरण करणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा! शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करावे लागणार नाहीत

1) निती आयोगाद्वारे राज्यात महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन -मित्र स्थापन करणार. तसेच शासनाला दर्जेदार सल्ला व धोरणात्मक मार्गदर्शन मिळणार आहे.

2) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड पदभरतीसाठी परीक्षा टीसीएस, आयबीपीएस घेणार आहे. दरम्यान या माध्यमातून 75 हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. (सामान्य प्रशासन विभाग)

3) तसेच ऐच्छिकरित्या वाहनांचे स्क्रॅपिंग करणाऱ्यांना व्याज व दंड माफ होणार आहे. त्यामुळे भंगार स्थितीतील वाहनांचा प्रश्न सुटणार. (परिवहन विभाग )

“पोलिस कर्मचाऱ्यांना एक पगार एवढा बोनस द्या..”, अमित ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलं भावनिक पत्र

4) 5G तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा वेगाने वाढविण्यासाठी दूरसंचार पायाभूत सुविधा धोरण. (माहिती तंत्रज्ञान विभाग)

5) मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अल्पसंख्याक महिलांचे 2800 बचत गट निर्माण करणार आहेत.तसेच 1500 महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण (अल्पसंख्यांक विकास विभाग)

‘या’ योजनेअतंर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबास मिळते २ लाखांची मदत, येथे करा अर्ज

6) भू विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी एकूण 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी होणार. दरम्यान भूविकास बँकेच्या मालमत्तांचे शासनाकडे हस्तांतरण करणार (सहकार विभाग)

7) तसेच “महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क” संस्थेस अनुदान स्वरुपात निधी देणार.त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे शक्य (पणन विभाग)

आनंदाची बातमी! भीमा पाटस कारखाना होणार लवकरच चालू

8) 30 जून 2022 पर्यंतचे राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील खटले आता मागे घेण्यात येणार. (गृह विभाग)

9) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतून माहिती तंत्रज्ञान तज्ञ विभागातील राजपत्रित पदे वगळण्यात येणार.

10) बुलडाणा जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता.दरम्यान 1918 हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा (जलसंपदा विभाग)

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने वयाच्या ५६ व्या वर्षी केले २३ वर्षीय मुलीशी गुपचूप दुसरं लग्न, कारण…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *