मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये गुरूवारी इंदूरच्या स्नेह नगरमध्ये एका विहीरी वरील छत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती. माहितीनुसार, विहीर अनेकवर्ष जुनी असल्याने लोकांना वाचविण्यासाठी वेळ लागत आहे. यासाठी लष्कराचे ७५ लोक आले असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम देखील तैनात आहे.
विराट कोहलीने शेअर केली 10वीची मार्कशीट, गणितात सर्वात कमी गुण; पाहा पूर्ण निकाल
आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपघातामध्ये जवळपास ४० जणांचा मृत्यू झालाची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणच्या मृताच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून दोन लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
“..अन् गौतमीने त्याला भर कार्यक्रमात किस केलं”; व्हिडिओ झाला व्हायरल
दरम्यान, गुरुवारी मध्य प्रदेशातील इंदूरच्या ठाणे जुनी येथील पटेल नगर या ठिकाणी शिवमंदिरातील विहिरीचे छत कोसळल्याची घटना घडली. यावेळी अनेक लोक विहिरीत पडले होते. विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न चालूच आहेत.