मागच्या काही महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांड घडला होता. या खूनामुळे संपूर्ण देशभर संताप पसरलेला होता. आफताब पूनावाला या तरुणाने श्रद्धा वालकर (प्रियसी) चा खून करून तिच्या शरीराचे 35 तुकडे केले होते. खून केल्यानंतर तब्बल चार ते पाच महिन्यानंतर हे भयानक प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर आफताबला अटक झाली होती. सध्या याप्रकरणी न्यायालयामध्ये सुनावणी चालू आहे. यातच आता श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी गंभीर आरोप केलेला आहे.
बाबरीच्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे कडाडले; म्हणाले, “त्यावेळी सगळे उंदीर…”
सोमवारी ANI या वृत्तसंस्थेबरोबर संवाद साधताना श्राद्धाच्या वडिलांनी सांगितले की, “आफताबच्या आई-वडीलांना लपवले आहे. या केसमध्ये त्यांना समोर आणले पाहिजे. आफताबचे आई वडील कोठे आहेत? आणि मी त्यांना समोर आणण्याची मागणी करतो. असं ते म्हणाले आहेत.
बाबरीच्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे कडाडले; म्हणाले, “त्यावेळी सगळे उंदीर…”
त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, “आफताब श्रद्धाच दोषी आहे. त्याला फाशी झालीच पाहिजे. आफताबने पूर्ण नियोजन करत श्रद्धा वालकरचा खून केला आहे. मी माझ्या वकिलाला फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस अपील करण्यास सांगितली आहे,”
संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांना देखील दिले आव्हान