आजकाल प्रत्येक घरी स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलिंडर वापरतात. या गॅस सिलिंडरच्या दरात कायम चढ-उतार होत असतात. त्यामुळे ग्राहक कायम चिंतेत असतात. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला LPG गॅस सिलिंडरच्या किंमती जाहीर करतात. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे.
राज्यातील तीन हजार महिला दुबईमध्ये अडकल्या; रुपालीताई चाकणकर यांनी दिली धक्कादायक माहिती
यामुळे आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये झाली आहे. त्याचबरोबर मुंबईत एलपीजीचे दर 1052.50 रुपयांवरुन थेट 1102.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या मुहूर्तावर सर्वसामान्य लोकांना चांगलाच झटका बसला आहे.
विधानसभेत अजित पवारांनी उडवली गिरीश महाजनांची खिल्ली; म्हणाले, “अंकल… अंकल… काकीला नाव सांगेन”
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये 50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय कोलकत्ता, मुंबई, चेन्नई येथे दर अनुक्रमे 2221.5, 2071.5 , 2268 रुपये इतका आहे.
राज्यसेवा 2021 ची गुणवत्ता यादी जाहीर! सांगलीचा प्रमोद चौगुले ठरला सलग दुसऱ्यांदा अव्वल