राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून शासनाने जाहीर केली आहे. यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मदत व पुनर्वसन विभागाला दिले.
सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Decision) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता त्यांच्या पिकांची लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळणार आहे.
सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून शासनाने जाहीर केली आहे. यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज मदत व पुनर्वसन विभागाला दिले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 16, 2023
भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले, राज्यांमध्ये दंगली घडवून त्यांना…
मंत्रिमंडळ बैठकीतील अन्य निर्णय –
- आयटीआय कंत्राटी निदेशकांच्या मानधनात भरीव वाढ, आता मिळणार २५ हजार रुपये मानधन.
- अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता
- इले्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ
- मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 16, 2023
👉 #मंत्रिमंडळनिर्णय –
✅ आयटीआय कंत्राटी निदेशकांच्या मानधनात भरीव वाढ, आता मिळणार २५ हजार रुपये मानधन.
✅ अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय… pic.twitter.com/lkCy4artV9
लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या किती जागा? महाविकास आघाडीचा नवीन फॉर्म्युला काय? जाणून घ्या…