सध्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शेती पंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठा (Uninterrupted Power Supply) करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
Raj Thackeray: सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील राजकीय गोंधळ सुरु असतानाच राज ठाकरेंना मोठा धक्का!
त्याचबरोबर वर्ष 2025 पर्यंत 30 टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचा निर्णयदेखील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. वीज खरेदी करारानुसार वीज बिलाची रक्कम देण्यासाठी 700 कोटी रुपयांचा स्वतंत्र फंड देखील स्थापन करण्यात येणार आहे.
३ लाख रुपये किमतीचा ‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा आंबा!
हरित ऊर्जा निधीमधून चालू वर्षासाठी 100 कोटी रुपये इतका निधी खर्च करण्यात येणार आहे. या अभियानात वीज वाहिनीसाठीची जमीन अकृषी (NA) करण्याची गरज राहणार नाही. त्याचबरोबर अशा जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्पांना 30 वर्षांपर्यंत सर्व कर आणि शुल्कांतून सूट देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
IPL २०२३ सर्वोत्कृष्ट तरुण खेळाडूंची यादी, जाणून घ्या कोण आहेत?