तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे पुल कोसळला; पाहा VIDEO

A bridge collapses due to youth riots; Watch the VIDEO

रविवारी संध्याकाळी ६.३०च्या सुमारास गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला १०० वर्षे जुना झुलता पूल कोसळला आहे. दरम्यान या दुर्घटनेत आतापर्यंत १४० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच संपूर्ण देशभरातून या दुर्घटनेनंतर शोक व्यक्त होत आहे. काही तरुणांनी पुलावर केलेल्या हुल्लडबाजीमुळेच दुर्घटना झाल्याच सीसीटीव्हीमध्ये समोर आलं आहे. सीसीटीव्हीमध्ये पुलावर तरुणांची गर्दी होती आणि त्यातील काही तरुण पुलावर उड्या मारताना दिसत आहेत. यावेळी पूल हालत असल्याचंही व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. दरम्यान यानंतर काही वेळातच पूल कोसळला आणि सर्वजण खाली नदीत पडले.
दरम्यान या दुर्घटनेतून अहमदाबादचे रहिवासी विजय गोस्वामी आणि त्यांचे कुटुंबीय थोडक्यात बचावले.

शेतकऱ्यांसाठी आनंददायक! ‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळाला 3500 रुपये दर

विजय गोस्वामी हे त्यांच्या कुटुंबियांसोबत रविवारी दुपारच्या सुमारास या पुलावर पर्यटनासाठी गेले होते. दरम्यान यावेळी काही तरुण हा पूल मुद्दाम उड्या मारून हलवत असल्याचं गोस्वामी यांना दिसल. दरम्यान पुढचा धोका लक्षात घेता विजय गोस्वामी आणि त्यांचे कुटुंब अर्ध्यातूनच या पुलावरुन माघारी फिरले. दरम्यान अवघ्या काही तासातच हा पूल मच्छू नदीत कोसळला. विजय गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “तरुणांकडून हा पूल मुद्दाम हलवला जात असताना नागरिकांना चालणंदेखील अवघड झालं होतं. याबाबत पूल कर्मचाऱ्यांना माहिती दिली होती. मात्र, त्यांनी कारवाई केली नाही.”

ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल 29 वर्षीय विद्यार्थ्याला अटक

नेमकी घटना काय घडली ?

रविवारी संध्याकाळी ६.३०च्या सुमारास गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला १०० वर्षे जुना झुलता पूल कोसळला आहे. महत्वाची बाब म्हणजे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला हा पूल सहा महिने नूतनीकरणासाठी बंद होता. दरम्यान एका खासगी कंत्राटदाराने या पुलाची डागडुजी केली. गुजराती नववर्षदिनी म्हणजेच २६ ऑक्टोबरला हा पूल पुन्हा खुला करण्यात आला होता. त्यानंतर दिवाळीची सुट्टी आणि रविवार असल्यामुळे या पुलावर पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या पुलावर महिला आणि मुलांची संख्या जास्त होती. दरम्यान गर्दीमुळे वजन न पेलल्यामुळे पूल कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इतकंच नाही तर हा पूल वापरयोग्य असल्याचे प्रमाणपत्र पालिकेने दिलं नव्हतं, अशी माहिती मिळत आहे.

सोशल मीडियावर भावना व्यक्त करताय? तर सावधान, नाहीतर होईल ‘ही’ कारवाई

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *