Pune News । धक्कादायक! मालवाहू करणाऱ्या ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Pune News

Pune News । सध्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यात अपघातांमुळे (Accident) देखील मृत्यू होत आहेत. शिवाय हृदयविकाराचा झटका, दुर्मिळ आजार यामुळे देखील मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. आरोग्याकडे लक्ष न दिल्याने मृत्यू होतात. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. दरम्यान, कर्नाटकवरून पुण्याकडे मालवाहतुक करणाऱ्या ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Death by heart attack) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना भर सभेत शिवीगाळ; ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, सतपाल झेटिंग कावळे (वय ४५ वर्ष) असे या ट्रक चालकाचे नाव आहे. ते कर्नाटकाहून माल ट्रकमध्ये भरून पुण्याकडे चालले होते. पुणे-सोलापूर महामार्गावरून जाताना त्यांचा ट्रक लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात आला. त्यावेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांनी ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतला.

Politics News । आदित्य ठाकरे, संजय राऊत लवकरच जेलमध्ये जाणार…बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

ट्रक मधून खाली उतरून त्यांनी आपल्या नातेवाईकांना फोन केला आणि छातीत तीव्र वेदना होत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी जेवण करून थोड्यावेळ आराम करा असे सांगितले. त्यानुसार कावळे यांनी जेवण केले आणि झोपले. परंतु पुन्हा ते उठलेच नाही. याबाबत माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू (Truck Driver Died due to Heart Attack) झाला.

Pune Fire News । मोठी बातमी! पुण्यामध्ये मध्यरात्री भीषण आग, १० वाहने जळून खाक; लाखो रुपयांचे नुकसान

Spread the love