मागील अनेक महिन्यांपासून सगळीकडे गौतमी पाटीलची चर्चा सुरू आहे. लावणी करताना अश्लील हातवारे केल्याचा आरोप तिच्यावर केला जात होता. इतकंच नाही तर महाराष्ट्रात गौतमी पाटीलचे कार्यक्रम बंद व्हावेत अशीही मागणी करण्यात आली होती. दरम्यान गौतमी पाटिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. यामध्ये ती कपडे बदलताना दिसत असून याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
“…त्यामुळे अजित पवार यांच्या पोटात फार दुखत आहे”, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतमी पाटिलच्या सहकारी मैत्रिणीने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गौतमी पाटीलचा ( Gautami Patil) कपडे बदलतानाचा हा व्हिडीओ गुपचूप काढण्यात आला असून तो एका बनावट इन्स्टाग्राम खात्यावरून अपलोड करण्यात आला आहे. एवढंच नाही तर अज्ञात व्यक्तीने इन्स्टाग्राम सोबतच whatsapp वर देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे.
मोठी बातमी! दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खाते धारकांवर गुन्हा नोंद केला आहे. यामध्ये गौतमी पाटीलच्या नावाने दोन खाते व एका तरुणाच्या नावाने एक खाते अशा तीन विविध खाते धारकांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची सर्व माहिती पोलिसांनी दिली आहे.
बिग ब्रेकिंग! गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपींमध्ये जेलमध्येच हाणामारी; दोन जागीच ठार