Manoj Jarange Patil । मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) मिळावे यासाठी मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. जरी जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले असले तरी राज्यभर सभा घेण्यासाठी दौरा करत आहेत. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राज्याचे वातावरण तापू शकते. (Latest marathi news)
मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी जानेवारी महिन्यात मुंबईकडे गेले होते. मुंबईकडे जाताना त्यांनी ठिकठिकाणी सभा घेतल्या. या दरम्यान, पुण्यातील वाघोलीमध्ये विना परवाना स्पीकर लावून तसेच विना परवाना सभा घेतल्याप्रकरणी जरांगे पाटील यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तब्बल दीड महिन्यांंनंतर गुन्हा दाखल केला आहे.
याठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची तासभर सभा झाली होती. पण ही सभा त्यांच्या अंगलट आली आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात जरांगे पाटील यांच्यासह ८- १० जणांवर हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जरांगे पाटील यांची पुन्हा एकदा जाहीर सभा होणार आहे, असे सांगितले जात आहे.