Manoj Jarange Patil । मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) पेच अजूनही सुटला नाही. अशातच राज्य सरकार सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करत नसल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना गावोगावी रास्ता रोको करण्याचे आवाहन केले होते. पण आता या प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना खूप मोठा धक्का बसला आहे. (Maratha Reservation Strike)
Ajit Pawar । ब्रेकिंग! अजित पवारांना सर्वात मोठा धक्का; कट्टर समर्थकाने दिला तडकाफडकी राजीनामा
विना परवानगी रास्ता रोको करून वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी जरांगे यांच्यासहित त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. जरांगे पाटलांसाठी हा सर्वात मोठा धक्का समजला जात आहे. मराठवाड्यात तब्बल १०४१ जणांवर आणि बीड जिल्ह्यातल्या ४२५ जणांवर विविध पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद केली आहे. मनोज जरांगे यांच्यावर शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल केला आहे. (Latest marathi news)
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. या आरोपांवरून त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. आंदोलनकर्त्यांना कायदा हातात घेता येणार नसून सरकारने संयम ठेवलेला आहे. सरकारच्या संयमाचा अंत पाहू नका’, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना दिला आहे.