भारताच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये यंदा G 20 परिषद होणार आहे. छत्रपती संभाजीनगर ( Chh. Sambhajinagar) मध्ये देखील ही परिषद होणार असून या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. परंतु, शहरातील काही नागरिक अस्वच्छता निर्माण करत आहे. रस्त्यांवर करण्यात आलेल्या रंगरंगोटीवर नागरिक थुंकीच्या पिचकाऱ्या मारत आहेत. या गोष्टी लक्षात येताच प्रशासनाने ठोस पाऊले उचलली आहेत. यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये अस्वच्छता निर्माण करणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…
पोलिसांनी आतापर्यंत अशा 60 लोकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. शहरात लावलेल्या सीसीटीव्हीची मदत घेऊन हे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. एवढंच नाही तर या लोकांवर न्यायालयात खटले देखील दाखल करण्यात येणार आहेत. तसेच यापुढे देखील सार्वजनिक ठिकाणी मलमुत्र विसर्जन करणे, केरकचरा टाकणे, थुंकणे, अशा प्रकारचे गैरवर्तन करणाऱ्यांविरुद्ध छत्रपती संभाजीनगर शहर पोलीसांमार्फत कायदेशीर कारवाई सुरु ठेवण्यात येणार आहे. माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मर्सिडीज कार पेक्षा महाग आहे ‘हा’ 50 लाख किंमतीचा बैल; तुम्हाला माहिती आहे का? वाचा सविस्तर
दरम्यान G20 परिषदेच्या निमित्ताने अनेक विदेशी पाहुणे छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल झाले आहेत. या बैठकीसाठी देश विदेशातील व्यापार, उद्योग व महिला बालकल्याण क्षेत्रातील 125 प्रतिनिधी हजेरी लावणार आहेत. या पाहुण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच याठिकाणी ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हिडीओ प्रकरणाची थेट राज्य महिला आयोगाने घेतली दखल