मुंबई शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांच्यावर टिका केली होती. शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात शिरसाट बोलत होते. आता मात्र शिरसाटांचं तेच वक्तव्य त्यांना भोवलं असून शिरसाटांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
रिझर्व्ह बँक ग्राहकांना मोठा झटका देण्याच्या तयारीत!
आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात आपण गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली आहे. हा गुन्हा सुषमा अंधारे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून दाखल करणार असल्याचे दानवेनीं सांगितलं. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्तांकडे तक्रार देणार असल्याची माहिती दानवेंनी दिली.
तक्रार देणार असून कायदेशीर प्रक्रियेत कोणता गुन्हा दाखल होतो हेही त्यांना आम्ही सांगणार असल्याचे अंबादास दानवे म्हणाले. मध्यंतरी देखील अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. संजय शिरसाट देखील सुषमा अंधारे बद्दल बोलत आहे.
Jio ने लॉन्च केला सर्वात स्वस्त ब्रॉडबँड इंटरनेट प्लॅन! जाणून घ्या याबद्दल…
महिलांचा सतत अपमान करणाऱ्या नेत्यांना भाजप संरक्षण कसं काय देत असा सवाल यावेळी दानवेंनी केला. शिंदेचं बंड झाल्यानंतर मविआमधील अनेक नेत्यांना टार्गेट करत त्यांना तुरुंगात पाठवण्याचं काम सुरु असल्याचा आरोप मविआतील नेते करत होते. आता तिच संधी साधून मविआतील एका नेत्यानं शिंदे गटातील नेत्याविरोधात खटला दाखला केला आहे. दरम्यान, यानंतर आता पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.