“काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल सगळं ओके मध्ये आहे” फेम आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil ) यांच्याविषयी सोशल मीडियावर (Social Media) आक्षेपार्ह लिखाण करणे आता नेटकऱ्यांना महागात पडणार आहे. ज्यांनी शाजीबापूंविषय सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहले आहे अशा लोकांवर गुन्हा दाखल होणार आहे. अशी माहिती माजी पंचायत समिती सदस्य ॲड. बंडू काशीद यांनी दिली आहे.
यावर ॲड.बंडू काशीद (Adv. Bandu Kashid) म्हणाले, “आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विषयी कोणताही कायदेशीर पुरावा नसताना त्यांच्याबद्दल बोलत आहेत. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावे विनाकारण ज्या गुन्ह्यामध्ये शहाजीबापूंची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे त्यावर काहीही बोलू नये किंवा त्यांच्या खासगी आयुष्यावर देखील बोलू नये असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
“महिलांनी कपडे नाही घातले तरी सुंदर दिसतात…”, रामदेव बाबांचे वक्तव्य चर्चेत
पुढे ते म्हणाले की, ज्या लोकांनी जाणीवपूर्वक शहाजीबापूंना बदनाम करणे सुरू केले आहे त्यांना आता सुट्टी नाही त्यांच्या विरोधात लवकरच गुन्हे दाखल करणार आहे. त्यामुळे शाजीबापूंविषय सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहले आहे अशा लोकांवर गुन्हा दाखल होणार आहे.
मोठी बातमी! 12 डिसेंबर पासून पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरु?