लोकशाहीवर भाषण देणारा चिमुरडा देतोय ‘या’ गंभीर आजाराशी झुंज

A child giving a speech on democracy is fighting with 'this' serious illness

सध्या सोशल मीडियावर ( Social Media) एका लहान मुलाचे भाषण व्हायरल होत आहे. यामध्ये या मुलाने लोकशाहीची ( Speech On Democracy) साधी व सरळ व्याख्या सांगितली आहे. या मुलाच्या निरागस भाषणाला लोकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. यामुळे हा मुलगा सध्या प्रचंड चर्चेत आहे. कार्तिक वजीर (Kartik Vajir) असे या मुलाचे नाव आहे.

मोठी बातमी! पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन

आपल्या भाषणात कार्तिक म्हणतो की, “या लोकशाहीत तुम्ही भांडू शकता, तुम्ही मित्र होऊ शकता, तुम्ही प्रेमात राहू शकता. मला हिंडणे, खोड्या करणे, जंगलात फिरणे, माकडासारखे झाडांवर चढणे आवडते. माझे वडील माझ्यावर प्रेम करतात. कारण त्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे.”

अखेर प्रियांका चोप्राच्या मुलीचा चेहरा दिसला; पाहा VIDEO

दरम्यान कार्तिकबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कार्तिकची प्रकृती प्रचंड नाजूक असून तो जन्मापासून रातांधळा आहे. कार्तिकला रात्रीचे काही दिसत नाही. इतकंच नाही तर तो दिवसादेखील दोन फुटांपेक्षा जास्त पाहू शकत नाही.

कार्तिकला काही वाचायचे असेल तर त्याला ते अगदी तोंडासमोर आणावे लागते. त्याची त्वचा देखील खूप नाजूक आहे. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येताच कार्तिकची त्वचा लाल होते. यामुळे तो जास्त काळ उन्हात राहू शकत नाही.

Pakistan mosque blast: ६३ पोलिसांचा मृत्यू, १५० पेक्षा अधिकजण जखमी तर ४७ लोकांची प्रकृती गंभीर

कार्तिकच्या आईवडिलांना त्याच्यावर उपचार करायचे आहेत. मात्र त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ते कार्तिकचे उपचार करू शकत नाहीत. यामुळे कार्तिकचे कुटुंब व त्याच्या शिक्षकांनी त्याच्या शिक्षणासाठी लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

भारत जोडो यात्रेने काँग्रेसचे चित्र पालटले! लोकसभेत भाजपसमोर आव्हान उभे राहणार का?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *