तुम्ही आजपर्यंत दोन हात आणि दोन पाय असणारा माणूस पाहिला असेल. फार फार तर हाता-पायांची जास्ती बोटे असणारी माणसं तुम्हाला दिसली असतील. परंतु, बिहारमध्ये नुकताच चार पाय आणि चार हात (Boy with 4 legs and 4 hands) असणाऱ्या बाळाचा जन्म झाला आहे. या बाळाचा फोटो देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या बाळाला पाहण्यासाठी रुग्णालयात आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी गर्दी केली होती.
मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरणी पोलिसांची केली तिघांना अटक
बिहारमधील (Bihar) एका रुग्णालयात या बाळाचा जन्म झाला असून हा मुलगा अनोखा असून निसर्गाचा चमत्कार आहे किंवा तो देवाचा अवतार आहे. अशा चर्चा सध्या सर्वत्र होत आहेत. रुग्णालयातील डॉक्टरांच्या सांगण्यानुसार हे मूल शारीरिक दृष्ट्या अपंग असून असामान्य आहे. जन्मापूर्वी या मुलाचे अल्ट्रासाउंड करण्यात आले होते. तेव्हा देखील हे मुलं अगदी निरोगी दिसत होते. मात्र जन्मानंतर त्याला चार हात व चार पाय पाहून सगळेच थक्क झाले आहेत.
चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणारा व्यक्ती नेमका कोण?
या मुलाचे आईवडील मूळचे पश्चिम बंगालचे असून आपल्या मुलाने देखील सामान्य आयुष्य जगावे अशी त्यांची इच्छा आहे. परंतु, यासाठी मोठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. असे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने ही शस्त्रक्रिया करणे त्यांना शक्य नाही. अशी माहिती या बाळाच्या वडिलांनी दिली आहे.
चंद्रकांत पाटलांवर शाईफेकीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…