बागेश्वर बाबा यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता याप्रकरणी त्यांच्या विरोधात मुंबईतील (Mumbai News) वांद्रे पोलीस ठाण्यात (Bandra Police Station) लेखी तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, ही तक्रार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेनं केली आहे.
मोठी बातमी! दिल्लीच्या सपोर्टसाठी ऋषभ पंत मैदानात
काय म्हणाले होते बागेश्वर बाबा?
साईबाबांविषयी बोलताना ते म्हणाले, “आमच्या धर्मातील शंकराचार्यांनी साईबाबांना देवतांचे स्थान दिलेले नाही. कोणताही संत, मग तो गोस्वामी तुलसीदास जी असो वा सूरदास जी, तो संत, महापुरुष, युगपुरुष, मात्र तो देव नसतो. आता मी हे बोलल्यावर लोक यावरुन वाद घालतील,मात्र हे सांगणे देखील अत्यंत गरजेचे आहे की, कोल्ह्याची कातडी घालून कोणीही सिंह बनू शकत नाही,” असे वादग्रस्त वक्तव्य बागेश्वर बाबा यांनी केलं होते.
गौतमी पाटीलचा ‘हा’ आहे आवडता क्रिकेटर; स्वतःच याबाबत केला खुलासा
त्याचबरोबर “साईबाबा हे संत किंवा फकीर असू शकतात मात्र देव असू शकत नाही. तिथे हिंदू पद्धतीने पूजा होत असली तरी कोल्ह्याची कातडी घालून कोणीही सिंह बनू शकत नाही. असं देखील ते म्हणाले होते.
धक्कादायक! राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर 30 ते 40 जणांनी तलवारीने केला हल्ला; दोनजण गंभीर जखमी