पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोरच हावलदाराला मारहाण; व्हिडिओ होतोय व्हायरल

A constable was beaten in front of the Superintendent of Police's office; The video is going viral

पोलीस म्हणजे समाजाचे रक्षक असे समजले जाते. पोलीस आहेत म्हणून आपण कोठेही, कधीही आणि कसेही कोणत्याही भीतीशिवाय फिरू शकतो. मात्र जर पोलीसच सुरक्षित नसतील तर ? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होतोय. यामध्ये एका पोलीस हवलदाराला काही लोक मारत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे ही घटना पोलीस कार्यालयातच घडत असल्याचे पहायला मिळत आहे.

कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित; महावितरणचा मोठा निर्णय

त्याच झालंय अस की, या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये एका पोलीस हवलदाराला ( Police Havaldar) त्याची पत्नी, सासू व मेहुण्या मारहाण करताना दिसत आहेत. मारहाण झालेल्या पोलीस हवलदाराचे नाव प्रदीप यादव असे असून पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हा प्रकार घडला आहे.

मोठी बातमी! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील बबिताजी’चा अपघात

खरंतर प्रदीपचे लग्न ग्रेसी नामक महिलेशी 2017 मध्ये झाले होते. त्यानंतर त्याचे ग्रेसीसोबत वाद झाले होते. यानंतर मारहाण होण्याच्या आधी दोन दिवस प्रदीप हा आपणाला हुंड्यासाठी त्रास देत असल्याची तक्रार ग्रेसीने कानपूर पोलिसांत दिली होती. मारहाण झाली त्यादिवशी सुद्धा ग्रेसी तक्रार करण्यासाठी आपल्या माहेरच्या लोकांसोबत पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात आली होती.

खुशखबर! Royal Enfield नवीन बाईक लाँच करणार

यावेळी तो तिथे उपस्थित दिसताच ग्रेसीच्या माहेरच्या मंडळींनी त्याला मारण्यास सुरुवात केली. मारहाणीस घाबरून प्रदीपने कार्यालयात (SP Office) देखील जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच्या सासरच्यांनी पुन्हा एकदा पाठलाग करत त्याला मारण्यास सुरुवात केली. या मारहाणीत प्रदीपचे कपडे देखील फाटलेले दिसत आहेत.

‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे शेतीविषयक धोरण माहिती आहे का? वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *