Site icon e लोकहित | Marathi News

पुण्यातील नवले ब्रिजजवळील अपघातप्रकरणी फरार झाल्येल्या कंटेनर चालकाला अटक

A container driver who absconded in connection with the accident near Navale Bridge in Pune was arrested

पुण्यातील (Pune) नवले ब्रिज येथे एक धक्कादायक घटना घडली होती. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये कंटेनरने जवळपास २६ गाडयांना उडविले असून त्यामध्ये ६ ते १० जण जखमी होते. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान हा अपघात झाल्यानंतर चालक फरार झाला होता. मात्र या ट्रक चालकाला पकडण्यात पोलिसांना यश असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

Milk Price: ‘या’ डेअरीने दुधाच्या दरात केली वाढ; वाचा सविस्तर

दरम्यान, कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे हा भीषण अपघात घडला. हा अपघात रात्रीच्या सुमारास झाला. अपघातावेळी रस्त्यावर जास्त प्रमाणात ऑइल सांडल्याने रस्ता अधिकच निसरडा झाला त्यामुळे गाड्यांची संख्या देखील अधिकाधिक वाढली होती.

एकतर्फी प्रेमातून तरुणाने उचलले मोठे पाऊल; स्वतःला पेटवून घेत तरुणीला मारली मिठी

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाच्या गाड्या, १० ते १५ रुग्णवाहिका देखील अपघातस्थळी आल्या. अपघात इतका भीषण होता की जवळपास २६ गाड्या एकमेकांवर आदळल्या. कंटेनर हा साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता त्यामुळे वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या असून वाहतूक कोंडीही झालेली.

विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक; शेतकरी आक्रमक

Spread the love
Exit mobile version